मँचेस्टर - ओल्ड ट्रॅफर्डवर रंगलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक कसोटीत इंग्लंडने वेस्ट इंडिजला 269 धावांनी पराभूत केले आणि मालिका 2-1 अशी खिशात घातली. या सामन्याच्या पाचव्या दिवशी ख्रिस वोक्स (पाच बळी) आणि स्टुअर्ट ब्रॉड (चार बळी) या जोडीने शानदार गोलंदाजी करत विंडीजला झुकवले. विंडीजचा दुसरा डाव 129 धावांवर आटोपला. पहिल्या डावात अर्धशतक आणि 6 बळी तर दुसऱ्या डावात 4 बळी घेणाऱ्या ब्रॉडला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने विंडीजसमोर 399 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना त्यांच्या फलंदाजांपैकी फक्त पाच फलंदाज दुहेरी आकड्यांपर्यंत पोहोचू शकले. या डावात विंडीजकडून शाई होपने सर्वाधित 31 धावा केल्या. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने 50 धावात 5 तर, ब्रॉडने 36 धावात 4 बळी टिपले.
तब्बल 4 महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात झाली होती. विंडीजविरुद्ध कसोटी मालिकेनंतर इंग्लंड 30 जुलैपासून आयर्लंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळेल. तर यानंतर इंग्लंड त्यांच्या घरच्या मैदानावर पाकिस्तानविरूद्ध पुढील मालिका 5 ऑगस्टपासून खेळेल.
संक्षिप्त धाावफलक -