लंडन- कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी, इंग्लंडच्या पुरुष व महिला क्रिकेटपटूंनी त्यांच्या पगारात कपात करून ५ लाख पौंड दान देण्याचे ठरवले आहे. भारतीय चलनात ही रक्कम जवळपास ४ कोटी ६८ लाख इतकी होते.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने खेळाडूंच्या पगारात २० टक्के कपात करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. या प्रस्तावाला खेळाडूंनी होकार दर्शवला आहे. इंग्लंड क्रिकेट मंडळाला आता संलग्न क्रिकेट संघटनांच्या उत्तराची प्रतीक्षेत आहेत.
खेळाडूंच्या एप्रिल, मे आणि जून महिन्याच्या पगारात २० टक्के कपात करण्यात येणार आहे. याविषयी खेळाडूंनी सांगितलं, की 'करारबद्ध खेळाडूंशी झालेल्या बैठकीत सर्व खेळाडूंशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर पगार कपातीचा प्रस्ताव मान्य केला.'