मँचेस्टर - इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू सॅम करन विंडीज दौऱ्यापूर्वी आजारी पडला आहे. एजेस बाऊल येथील एका खोलीत त्याने स्वत:ला सेल्फ आयसोलेट करून घेतले. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) ही माहिती दिली.
सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी सॅमने नाबाद 15 धावा केल्या. या सामन्यानंतर रात्री त्याला ताप आणि अतिसाराचा त्रास झाला. "अष्टपैलू सॅम करनला रात्री ताप आणि अतिसाराचा त्रास झाला आहे. त्यानंतर दुपारपासून त्याला बरे वाटत आहे. संघाचे डॉक्टर त्याच्याकडे लक्ष ठेऊन आहेत. आज सकाळी त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली", असे ईसीबीने सांगितले.