महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

बेन स्टोक्सच्या वडिलांचे निधन, कॅन्सरविरुद्धची झुंज संपली

इंग्लंड संघासह मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी स्टोक्स सध्या दक्षिण आफ्रिकेचा दौरा करत आहे. तो तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळला होता. मात्र, बायो बबलमध्ये कोरोनाची प्रकरणे समोर आल्यानंतर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका रद्द करण्यात आली.

By

Published : Dec 9, 2020, 12:40 PM IST

england cricketer ben stokes' father has passes away at the age of 65
बेन स्टोक्सच्या वडिलांचे निधन, कॅन्सरविरुद्धची झुंज संपली

ख्राइस्टचर्च -इंग्लंडचा स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सचे वडील जेड स्टोक्स यांचे निधन झाले आहे. वर्षभर ब्रेन कॅन्सरशी झुंजणाऱ्या जेड यांनी काल मंगळवारी अखेरचा श्वास घेतला. ते ६५ वर्षांचे होते.

बेन स्टोक्सच्या वडिलांचे निधन

हेही वाचा -पार्थिव पटेलची क्रिकेटमधून निवृत्ती

इंग्लंड संघासह मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी स्टोक्स सध्या दक्षिण आफ्रिकेचा दौरा करत आहे. तो तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळला होता. मात्र, बायो बबलमध्ये कोरोनाची प्रकरणे समोर आल्यानंतर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका रद्द करण्यात आली.

बेन स्टोक्सच्या वडिलांचे निधन

बेनचे वडील काही काळापासून मेंदूच्या कर्करोगाने ग्रस्त होते. त्यामुळे बेन आपल्या वडिलांच्या आजारपणाच्या वेळी ख्राइस्टचर्चमध्ये होता. मूळचे न्यूझीलंडचे असलेले जेड स्टोक्स हे उत्कृष्ट रग्बीपटू आणि प्रशिक्षक होते. काही दिवसांपूर्वी आपल्या वडिलांसोबत राहता यावे यासाठी बेन स्टोक्सने पाकिस्तानविरुद्ध दौऱ्यातून माघार घेत न्यूझीलंडला आपल्या परिवारासोबत राहणे पसंत केले होते. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने आपल्या ट्विटर हँडलवर जेड स्टोक्स यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

बेन स्टोक्सच्या वडिलांचे निधन

ABOUT THE AUTHOR

...view details