चेन्नई -कसोटी मालिकेत श्रीलंकेचा धुव्वा उडवल्यानंतर इंग्लंडचा संघ भारत दौर्यावर आला आहे. आज दुपारी इंग्लंडचा संघ चार्टर्ड विमानाने चेन्नई विमानतळावर पोहोचला. इंग्लंडचे बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि मोईन अली हे याआधीच चेन्नईत दाखल झाले आहेत. हे खेळाडू श्रीलंका दौऱ्यातील इंग्लंड संघाचा भाग नसल्याने लवकर चेन्नईत पोहोचले आहेत.
हेही वाचा - केरळ उच्च न्यायालयाची विराटला कायदेशीर नोटीस
कोरोना प्रोटोकॉलचे पालन करत चेन्नई विमानतळावरील कर्मचार्यांनी इंग्लंड संघाचे स्वागत केले. इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या संघाच्या चेन्नईतील आगमनाचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. तामिळनाडू क्रिकेट संघटनेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही संघ चेन्नईच्या लीला पॅलेस या हॉटेलमध्ये ६ दिवस बायो बबलमध्ये राहतील. २ फेब्रुवारीपासून दोन्ही संघांना सरावाला प्रारंभ करण्याची परवानगी आहे. ५ फेब्रुवारीपासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होईल.