महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

आयर्लंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा, 4 वर्षानंतर संघात परतला 'हा' खेळाडू - इंग्लंड वि आयर्लंड लेटेस्ट न्यूज

आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला विश्रांती देण्यात आली आहे. तर, 2016च्या वर्ल्डकपमध्ये इंग्लंड संघाचा सदस्य असलेला गोलंदाज टॉपले चार वर्षानंतर संघात परतला आहे.

england cricket board announces 14 man squad for ireland odi series
आयर्लंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा, 4 वर्षानंतर संघात परतला 'हा' खेळाडू

By

Published : Jul 27, 2020, 6:18 PM IST

Updated : Jul 29, 2020, 3:38 PM IST

नवी दिल्ली - आयर्लंडविरुद्ध या महिन्यात होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी इंग्लंड संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला विश्रांती देण्यात आली असून रीस टॉपलेचे 4 वर्षांनंतर एकदिवसीय संघात पुनरागमन करत आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जाणार्‍या 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना सध्या मँचेस्टरमध्ये खेळला जात आहे. या सामन्याच्या दोन दिवसानंतर 30 जुलैपासून आयर्लंड आणि इंग्लंड यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यात येणार आहे. इंग्लंडकडून घोषित करण्यात आलेल्या या 14 सदस्यीय संघाचे नेतृत्व इऑन मॉर्गनकडे देण्यात आले आहे.

रीस टॉपलेचे 4 वर्षांनंतर एकदिवसीय पुनरागमन -

2016च्या वर्ल्डकपमध्ये इंग्लंड संघाचा सदस्य असलेला गोलंदाज टॉपले चार वर्षानंतर संघात परतला आहे. इंग्लंडकडून 10 एकदिवसीय सामने खेळलेल्या या गोलंदाजाने एकूण 16 बळी घेतले आहेत. 14 फेब्रुवारी 2016 ला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने आपला शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता.

इंग्लंडचा संघ -

इयन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेयरस्टो, टॉम बॅंटन, सॅम बिलिंग्ज, टॉम करन, लियाम डॉसन, जो डेन्ली, साकीब महमूद , आदिल रशीद , जेसन रॉय, रीस टॉपले, जेम्स विन्स, डेव्हिड विले.

राखीव खेळाडू - रिचर्ड ग्लेसन, लुईस ग्रेगरी, लियाम लिव्हिंगस्टोन

Last Updated : Jul 29, 2020, 3:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details