नवी दिल्ली -इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ECB) आगामी वनडे आयसीसी विश्वचषकासाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघाचे नेतृत्व इऑन मॉर्गनकडे देण्यात आले आहे. विश्वचषक स्पर्धेत यजमान इंग्लंडचा पहिला सामना ३० मेला दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. तर स्पर्धेचा अंतिम सामना १४ जुलैला लॉडर्सच्या ऐतिहासिक मैदानावर होणार आहे.
इंग्लंडने आपल्या संघात अष्ठपैलू खेळाडूंना मोठ्या प्रमाणात स्थान दिले आहे. बेन स्टोक्स, मार्क वुड, मोईन अली, क्रिस वोक्स, टॉम करन यांना संघात स्थान देण्यात आले आहे. मोइन व्यतीरीक्त लेग स्पिनर आदील रशीदचाही संघात समावेश करण्यात आला आहे.