कोलंबो - इंग्लंडने श्रीलंकेचा दुसऱ्या कसोटी सामन्यात सहा गडी राखून पराभव केला मालिकेत २-० असे निर्भेळ यश मिळवले. पहिल्या डावात १८६ धावांची खेळी साकारणारा रूट सामनावीर आणि मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
चौथ्या दिवशी इंग्लंडच्या फिरकीसमोर श्रीलंकेचा दुसरा डाव गडगडला. जॅक लीच आणि डॉमिनिक बेस या दोघा फिरकीपटूंनी प्रत्येकी चार बळी घेत श्रीलंकेला दुसऱ्या डावात १२६ धावांत रोखले. यामुळे इंग्लंडला विजयासाठी १६४ धावांचे लक्ष्य मिळाले.