महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

WI VS ENG : जॉर्डनच्या धडाक्यासमोर विंडीज ४५ धावांतच गारद - ख्रिस जॉर्डन

इंग्लंडच्या १८४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजचा संघ अवघ्या ४५ धावांतच गारद झाला. इंग्लंडच्या ख्रिस जॉर्डनने २ षटकात ६ धावा देताना ४ गडी बाद केले.

ख्रिस जॉर्डन ११

By

Published : Mar 9, 2019, 1:28 PM IST

सेंट किट्स - दुसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यात इंग्लंडने विंडीजला १३७ धावांनी पराभूत केले. इंग्लंडच्या १८४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजचा संघ अवघ्या ४५ धावांतच गारद झाला. इंग्लंडच्या ख्रिस जॉर्डनने २ षटकात ६ धावा देताना ४ गडी बाद केले. विजयासह इंग्लंडने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.

विंडीजने सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंडची सुरुवात खराब झाली. ५.२ षटकात इंग्लंडची ४ षटकात ३२ धावा अशी बिकट अवस्था होती. यानंतर जो रुट (५५ धावा) आणि सॅम बिलिंग्ज यांनी चांगली फलंदाजी करताना पाचव्या गड्यासाठी ८२ धावांची भागीदारी केली. सॅम बिलिंग्जने चांगली फलंदाजी करताना ४७ चेंडूत ८७ धावांची आक्रमक खेळी करत संघाला १८३ धावसंख्येपर्यंत पोहचवले.

इंग्लंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजची सुरुवात खराब झाला. ख्रिस गेल ५ धावा आणि शाई होप ७ धावा करून माघारी परतले. विंडीजच्या कोणत्याही फलंदाजाला इंग्लंडच्या गोलंदाजीसमोर टिकता आले नाही. शिमरॉन हेटमायर आणि कार्लोस ब्रॅथवेट या दोघांनी १० धावा करताना दुहेरी आकडा गाठला. इतर कोणताही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. विंडीजचा संघ अवघ्या ४५ धावांत सर्वबाद झाला.

विंडीजची ४५ ही धावसंख्या आतार्यंत टी-ट्वेन्टी सामन्यातील दुसरी सर्वात निचांकी धावसंख्या ठरली. तर, कसोटी क्रिकेट खेळणाऱया देशांत ही सर्वात निचांकी धावसंख्या ठरली. इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डनने ४ गडी बाद केले. त्याला डेव्हिड विली, आदिल राशिद आणि लियाम प्लंकेट यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद करत चांगली साथ दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details