लंडन -इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) मंगळवारी पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी १४ सदस्यीय संघाची घोषणा केली. पाकिस्तानविरूद्ध सुरू असलेल्या कसोटीतील इंग्लंडच्या खेळाडूंना या टी-२० संघात इंग्लंडने स्खान दिलेले नाही.
या टी-२० मालिकेचा पहिला सामना २८ ऑगस्टला, दुसरा सामना ३० ऑगस्टला आणि तिसरा सामना १ सप्टेंबरला होणार आहे. हे तीनही सामने मॅँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळले जातील. संघाचे नेतृत्व इयान मॉर्गन करणार आहे. त्याचबरोबर टी-२० संघात डेव्हिड मालन आणि अष्टपैलू ख्रिस जॉर्डनचा समावेश आहे. हे दोन्ही खेळाडू दुखापतीमुळे त्रस्त होते आणि आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत संघाचा भाग नव्हते.