लंडन -लॉर्ड्सवर आयर्लंडचा सुपडा साफ केल्यानंतर विश्वविजेता इंग्लंडचा संघ अॅशेस मालिकेसाठी सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघाने शनिवारी १४ सदस्यीय संघ जाहीर केला. या संघामध्ये एक मोठा बदल झाला आहे.
या मालिकेसाठी जो रुटला कर्णधारपद तर विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 'हिरो' ठरलेल्या बेन स्टोक्सला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. इंग्लंडचा युवा गोलंदाज जोफ्रा आर्चरला संघात स्थान देण्यात आले आहे.
एक ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या या कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच पांढऱ्या जर्सीवर खेळाडूंची नावे आणि क्रमांक पाहायला मिळणार आहे. इंग्लंडने त्यांच्या ट्विटर हँडलवरून याची अधिकृत घोषणाही केली आहे. सोबत, आपल्या संघातील खेळाडूंचा नवीन जर्सीतील लूक सोशल मीडियावर जाहीर केला आहे. आयसीसीच्या नवीन नियमांनुसार, कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या जर्सीवर हा बदल करण्यात येणार आहे.
इंग्लंडचा संघ -
- जो रूट ( कर्णधार), मोइन अली, जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, जोस बटलर, सॅम कुरन, जोए डेन्ली, जेसन रॉय, बेन स्टोक्स, ऑली स्टोनस ख्रिस वोक्स.
ऑस्ट्रेलियाचा संघ
- टिम पेन (कर्णधार), कॅमरन बॅनक्रॉफ्ट, पॅट कमिन्स, मार्कस हॅरिस, जोश हेजलवुड, ट्रेविड हेड, उस्मान ख्वाजा, नेथन लॉयन, मिचेल मार्श, माइकल नेसर, जेम्स पॅटिनसन, पीटर सीडल, स्टिव स्मिथ, मिचेल स्टार्क, मैथ्यू वेड आणि डेव्हिड वॉर्नर
अशी होईल अॅशेस मालिका -
- पहिली कसोटी - 1 ते 5 ऑगस्ट, एडबॅस्टन, बर्मिंगहॅम
- दुसरी कसोटी - 14 ते 18 ऑगस्ट, लॉर्ड्स, लंडन
- तिसरी कसोटी - 22 ते 26 ऑगस्ट, हेडिंग्ली, लीड्स
- चौथी कसोटी - 4 ते 8 सप्टेंबर, ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
- पाचवी कसोटी - 12 ते 16 सप्टेंबर, ओव्हल, लंडन