लंडन - इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) आपल्या कर्मचार्यांमध्ये २० टक्क्यांची कपात केली असून यात ६२ नोकऱ्यांचा समावेश आहे. मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) टॉम हॅरिसन यांनी मंगळवारी ही माहिती दिली. कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटामुळे हे पाऊल उचलले जात आहे, असे हॅरिसन यांनी सांगितले.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड कर्मचार्यांमध्ये करणार कपात - ecb latest news
ईसीबीचे सीईओ टॉम हॅरिसन म्हणाले, "कामगारांची संख्या २० टक्क्यांनी कमी करण्याचा प्रस्ताव आहे, त्यानुसार ६२ नोकऱ्या कमी कराव्या लागतील.''
हॅरिसन म्हणाले, "अलीकडील आठवड्यात आम्ही आमच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्याच्या हेतूने खर्च कमी करण्यासाठी ईसीबीच्या संरचनेची आणि बजेटचा आढावा घेतला आहे. आम्ही हा संदेश कर्मचाऱ्यांना दिला असून याला मंजुरी मिळाली आहे. यामुळे आवश्यक बचत होऊ शकते. याचा परिणाम ईसीबीच्या प्रत्येक भागावर होईल. काही कपात केल्यामुळे ही बचत शक्य आहे. "
ते म्हणाले, "कामगारांची संख्या २० टक्क्यांनी कमी करण्याचा प्रस्ताव आहे, त्यानुसार ६२ नोकऱ्या कमी कराव्या लागतील. पदांची संख्या बदलून आम्ही बचत करण्याचा विचारही करत आहोत. या प्रस्तावामुळे जे लोक संकटात सापडतील त्यांना मदत करण्यासाठी ईसीबी तयार आहे.