मँचेस्टर - इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात खेळल्या जाणार्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेचा शेवटचा आणि निर्णायक सामना आजपासून ओल्ड ट्रॅफर्डवर रंगणार आहे. पहिल्या सामन्यात विंडीजने तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने बाजी मारत मालिका 1-1 अशी बरोबरीत राखली आहे.
आतापर्यंत या मालिकेत दोन्ही संघांमध्ये चांगली स्पर्धा झाली आहे. तिसर्या कसोटीतही हाच थरार अपेक्षित आहे. सामन्यात प्रत्येकाचे लक्ष दोन्ही संघांच्या वेगवान गोलंदाजीवर असेल. इंग्लंड संघाचे प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूड यांनी या सामन्यासाठी वेगवान गोलंदााजांची फळी उपयोगात आणणार असल्याचे आधीच सांगितले आहे. अशा परिस्थितीत जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड आणि जोफ्रा आर्चर हे तिघे एकत्र दिसण्याची शक्यता आहे.