ख्राईस्टचर्च - सलामी फलंदाज टॅमी ब्यूमोंट (७१) आणि कर्णधार हिथर नाइट (नाबाद ६७) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाने न्यूझीलंड संघाचा पहिल्या एकदिवसीय सामन्यात पराभव केला. इंग्लंडने हा सामना ८ गडी राखून जिंकत ३ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली.
न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना सलामी फलंदाज हेली जेंसन ५३ आणि ब्रुक हालिडे याच्या ५० धावांच्या जोरावर ४५.१ षटकात १७८ धावांचे आव्हान उभारले. इंग्लंडकडून ताश फरांट आणि सोफी एकलेस्टोन यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले. तर कॅथरीन ब्रंट, फ्रेया डेविस, नताली स्कायवर, साराह ग्लेन आणि नाइट यांनी प्रत्येकी १-१ गडी टिपला.