वेलिंग्टन- इंग्लंडचा संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. उभय संघात २ सामन्याची टी-२० मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान न्यूझीलंडने इंग्लंडला १ डाव ६५ धावांनी धूळ चारली. दुसरा सामना हॅमिल्टन येथे रंगणार असून या सामन्यापूर्वी न्यूझीलंडचे दोन खेळाडू , तर इंग्लंडचा एक खेळाडू असे एकूण तीन खेळाडू दुखापतग्रस्त आहेत.
न्यूझीलंड आणि इंग्लंड संघात शुक्रवारपासून (२९ नोव्हेंबर) हॅमिल्टनच्या मैदानावर दुसरा कसोटी सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि अष्टपैलू क्रिकेटपटू कॉलिन डी ग्रँडहोम दुखापतीमुळे बाहेर पडले. त्यानंतर आता इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरला दुखापत झाली. यामुळे तो हा सामना खेळणार की नाही, याबाबत साशंकता आहे.
पहिल्या कसोटी सामन्यात ग्रँडहोमने चांगली कामगिरी केली होती. त्याने ६५ धावांच्या महत्वपूर्ण खेळीसह ३ गडी बाद केले होते. पण त्याला स्नायूंच्या दुखापतीचा त्रास होत असल्याने, दुसऱ्या कसोटी सामन्यातून त्याला बाहेर पडावे लागले. बोल्टला पहिल्या सामन्याच्या शेवटच्या दिवशी दुखापत झाली. यामुळे बोल्टला पहिला कसोटी सुरू असतानाच मैदान सोडावे लागले होते.