महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

आयपीएल-२०२० भारताबाहेर..?  युएई क्रिकेट बोर्ड आयोजन करण्यास तयार - Emirates cricket board on ipl

युएई क्रिकेट बोर्डाचे (ईसीबी) महासचिव मुबाशिर उस्मानी म्हणाले, "आम्ही पुढाकार घेऊन भारत आणि इंग्लंडला येथे खेळण्याची ऑफर देत आहोत. यापूर्वीही, ईसीबीने युएईमध्ये आयपीएल सामन्यांचे आयोजन केले होते. आम्ही इंग्लंड संघाचे अनेक सामने आयोजित केले आहेत. कोणत्याही मंडळाने आमच्या प्रस्तावाला मंजुरी दिली तर त्यांच्या सामन्यांचे आयोजन करण्यात आम्हाला आनंद होईल."

Emirates cricket board ready to host ipl 2020
युएई क्रिकेट बोर्ड आयपीएलचे आयोजन करण्यास तयार

By

Published : Jun 7, 2020, 3:16 PM IST

दुबई - इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 13 व्या हंगामाच्या आयोजनासाठी बीसीसीआयचे मत 3-2 असे विभागले गेले. या मतांमध्ये बहुतेकांना ही लीग भारतातच खेळवण्यात यावी असे वाटत असून गरज भासल्यास ही लीग भारताबाहेर आयोजित करावी असेही काहींनी मत दिले. त्यानंतर, युएई क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयसमोर आयपीएलचे आयोजन करण्याचा प्रस्ताव दिला आहे. युएई क्रिकेट बोर्डाचे (ईसीबी) महासचिव मुबाशिर उस्मानी यांनी सांगितले "आम्ही तटस्थ स्थान म्हणून अनेक मालिका आयोजित केल्या आहेत. आमच्या सुविधा सर्व प्रकारच्या क्रिकेटच्या आयोजनासाठी योग्य आहेत."

ते म्हणाले, "आम्ही पुढाकार घेऊन भारत आणि इंग्लंडला येथे खेळण्याची ऑफर देत आहोत. यापूर्वीही, ईसीबीने युएईमध्ये आयपीएल सामन्यांचे आयोजन केले होते. आम्ही इंग्लंड संघाचे अनेक सामने आयोजित केले आहेत. कोणत्याही मंडळाने आमच्या प्रस्तावाला मंजुरी दिली तर त्यांच्या सामन्यांचे आयोजन करण्यात आम्हाला आनंद होईल."

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने एका वृत्तसंस्थेला सांगितले, ''आयपीएल आयोजित करण्याबाबत सर्वसाधारण विचार म्हणजे लीग भारतात झाली पाहिजे. परंतु अशीही काही माणसे आहेत ज्यांना भारताबाहेर लीग खेळवावी असे वाटते.''

अधिकारी म्हणाले, “कोण काय बोलले हे न पाहता सर्वसाधारण मत असे आहे की, भारतात लीग असणे हे देशातील लोकांसाठी सकारात्मकतेचे प्रतीक आहे. शिवाय, आम्हालाही परदेशात जाण्याची गरज नसल्यामुळे एकप्रकारे मदत होईल. इथल्या काही लोकांचा असा विश्वास आहे की स्पर्धा प्रत्येक परिस्थितीत आयोजित केली जावी. या लीगचे आयोजन हा चर्चेचा विषय आहे. त्याशिवाय खेळाडूंची सुरक्षा आणि सर्व लोकांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे."

ABOUT THE AUTHOR

...view details