ईद मुबारक..! सचिनसह अनेक क्रिकेटपटूंनी दिल्या शुभेच्छा - इरफान पठाण ईद
आज रमजान ईदच्या निमित्ताने, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, भाजप खासदार माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर, इरफान पठाण यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंनी ईद च्या शुभेच्छा दिल्या.
![ईद मुबारक..! सचिनसह अनेक क्रिकेटपटूंनी दिल्या शुभेच्छा Eid-ul-Fitr 2020: Sachin Tendulkar, Irfan Pathan And Other Cricket Stars Extend Eid Greetings](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7344049-601-7344049-1590414185743.jpg)
मुंबई- आज रमजान ईदच्या निमित्ताने, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, भाजप खासदार माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर, इरफान पठाण, मोहम्मद शमी यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंनी ईदच्या शुभेच्छा दिल्या. सध्या कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊनची सुरू आहे. यामुळे मोठ्या संख्येने एकत्र जमणे किंवा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व जण आपल्या घरी सुरक्षित राहून ईद साजरी करत आहेत. भारतीय खेळाडूंनी ट्विटच्या माध्यमातून ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पाहा खेळाडूंनी केलेल ट्विट...