लंडन -इंग्लंड अॅण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) गुरुवारी त्यांच्या संलग्न क्रिकेट लीगसाठी 'आपत्कालीन कर्ज योजना' सुरू केली आहे. कोरोना संकटादरम्यान बोर्डाशी संबंधित स्पर्धांना (खुला गट आणि ज्युनियर लीग) व्याजाशिवाय कर्जे दिले जातील, असे ईसीबीने आपल्या संकेतस्थळावर म्हटले. क्रिकेटच्या कोलमडलेल्या वेळापत्रकासाठी ईसीबीने हा निर्णय घेतला आहे.
ईसीबीशी संलग्न असलेले किंवा काऊंटी क्रिकेट बोर्ड (सीसीबी), नॅशनल एशियन क्रिकेट कौन्सिल (एनएसीसी), नॅशनल क्रिकेट कॉन्फरन्स (एनसीसी) आणि आफ्रो-कॅरिबियन क्रिकेट असोसिएशन (एसीसीए) यासह 2019 किंवा 2020 मध्ये भागीदारी असलेल्या लीग कर्जासाठी अर्ज करू शकतात.