हैदराबाद - भारतीय क्रिकेट संघाचा 'चाणक्य' महेद्रसिंह धोनी आज आपला 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी धोनीचा चेन्नई सुपर किंग्जचा सहकारी आणि विंडीजचा स्टार क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्होने त्याला अनोखी भेट दिली आहे.
ड्वेन ब्राव्होची धोनीला वाढदिवसानिमित्त खास 'भेट' - ड्वेन ब्राव्होचे धोनीला गिफ्ट
धोनीच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी ब्राव्होने 'हेलिकॉप्टर 7' हे गाणे प्रसिद्ध केले. ''तर प्रतीक्षा संपली. माही तू जगभरातील बर्याच लोकांसाठी एक प्रेरणा आहेस. आम्ही तुझा वाढदिवस साजरा करण्यास तयार आहोत. माझ्या संघाकडून, माझ्या चाहत्यांकडून आणि तुझ्या चाहत्यांकडून आशिर्वाद. हेलिकॉप्टरने उड्डाण केले आहे'', असे त्याने म्हटले आहे.

ब्राव्होचे हे गाणे चेन्नई सुपर किंग्जनेही ट्विटरवर शेअर केले आहे. ब्राव्होचे हे गाणे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेक लोकांनी हे गाणे आपल्या अकाऊंटवरून शेअर केले आहे. यापूर्वी ब्राव्होच्या चॅम्पियन गाण्याला लोकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला होता.