मेलबर्न -ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक-फलंदाज गिलख्रिस्टने आपल्या कारकिर्दीत सामना करावा लागलेल्या सर्व गोलंदाजांमध्ये भारताचा हरभजन सिंग महान प्रतिस्पर्धी असल्याचे उघड केले आहे. गिलख्रिस्टने २००१ मध्ये भारताविरुद्धच्या कसोटीतील पराभवाचा पुनरूच्चार केला.
हेही वाचा -स्पेनचा दिग्गज खेळाडू डेव्हिड विलाने जाहीर केली निवृत्ती
या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाचा सलग १६ कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम मोडीत निघाला होता. या मालिकेच्या पहिल्या सामन्यात गिलख्रिस्टने दमदार शतक ठोकले होते. एका मुलाखतीदरम्यान गिलख्रिस्टने या सामन्याच्या आठवणींवर चर्चा केली. 'मी जेव्हा फलंदाजीला गेलो तेव्हा आमच्या संघाचे ९९ धावांवर पाच गडी बाद झाले होते. मी त्यावेळी ८० चेंडूंत शतक झळकावले होते. या खेळीनंतर, 'हे बाद झालेले खेळाडू ३० वर्षांपर्यंत काय करत होते? आणि हे किती सोपे आहे', असे मला वाटले. पण माझा हा गैरसमज दुसऱ्या सामन्यात दूर झाला.'
'या मालिकेत हरभजन हा माझा कट्टर प्रतिस्पर्धी होता. हरभजननंतर, मुरली कार्तिकला खेळणेही अवघड झाले असल्याचे गिलख्रिस्टने म्हटले आहे. २००१ मध्ये झालेल्या या तीन सामन्यांच्या मालिकेत हरभजनने एकूण ३२ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामध्ये भज्जीच्या पहिल्या हॅटट्रिकचाही समावेश होता.