महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

दुलीप ट्रॉफी २०१९ : इंडिया रेडने पटकावला दुलीप चषक - दुलीप ट्रॉफी २०१९

इंडिया रेड संघाने दुलीप चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंडिया ग्रीनचा एक डाव ३८ धावांनी पराभव करत जेतेपद पटकावले. विदर्भाचा फिरकीपटू अक्षय वाखरे याने ५ गडी बाद करत इंडिया रेड संघाला विजेतेपद मिळवून दिले.

दुलीप ट्रॉफी २०१९ : इंडिया रेडने पटकावले दुलीप चषक

By

Published : Sep 7, 2019, 11:23 PM IST

बंगळुरू - इंडिया रेड संघाने दुलीप चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंडिया ग्रीनचा एक डाव ३८ धावांनी पराभव करत जेतेपद पटकावले. विदर्भाचा फिरकीपटू अक्षय वाखरे याने ५ गडी बाद करत इंडिया रेड संघाला विजेतेपद मिळवून दिले.

बंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानात झालेल्या अंतिम सामन्यात इंडिया रेडने पहिल्या डावामध्ये सर्वबाद ३८८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल इंडिया ग्रीनचा पहिला डाव २३१ धावांवर आटोपला. यामुळे इंडिया रेडला पहिल्या डावात १५७ धावांची आघाडी मिळाली.

तेव्हा इंडिया ग्रीनच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. तेव्हा अक्षय वाखरे याने ५ आणि आवेश खान याने ३ गडी बाद करत इंडिया ग्रीनच्या फलंदाजीला खिंडार पाडले आणि सामना एक डाव ३८ धावांनी जिंकला.

संक्षिप्त धावफलक -
इंडिया ग्रीन - २३१ & ११९
इंडिया रेड - ३८८

ABOUT THE AUTHOR

...view details