महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL २०२० : दोन तुल्यबळ संघात आज लढत, मुंबई-दिल्लीमध्ये अव्वलस्थानासाठी चढाओढ - मुंबई इंडियन्स स्क्वाड टुडे

आयपीएल २०२० मध्ये आज सायंकाळी गतविजेते मुंबई इंडियन्स आणि गुणतालिकेत अग्रस्थानी असलेल्या दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत होणार आहे.

DREAM11 IPL 2020, MATCH 27: MI VS DC  PREVIEW
IPL २०२० : दोन तुल्यबळ संघात आज लढत, मुंबई-दिल्लीमध्ये अव्वलस्थानासाठी चढाओढ

By

Published : Oct 11, 2020, 12:40 PM IST

Updated : Oct 11, 2020, 4:01 PM IST

अबुधाबी- आयपीएल २०२०मध्ये आज सायंकाळी गतविजेते मुंबई इंडियन्स आणि गुणतालिकेत अग्रस्थानी असलेल्या दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत होणार आहे. या लढतीच्या निमित्ताने दिग्गज खेळाडूंदरम्यान 'टशन' अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे. उभय संघांचा फलंदाजीचा क्रम शानदार आहे आणि मधली फळी देखील मजबूत आहे. त्याचप्रमाणे उभय संघांच्या गोलंदाजी आक्रमणामध्ये भेदकता आहे. त्यामुळे ही लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे.

  • श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात दिल्लीचा संघ यंदाच्या हंगामात स्वप्नवत कामगिरी करत आहे. दिल्लीचे युवा पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, शिमरोन हेटमायर आणि कर्णधार अय्यर सातत्याने धावा करत आहेत. त्यांना अनुभवी शिखर धवनची साथ लाभत आहे. तसेच मार्कस स्टोइनिस सातत्याने अष्टपैलू योगदान देत आहे. गोलंदाजीत कागिसो रबाडा, एनरिच नोर्जे, हर्षल पटेल हे टिच्चून मारा करत आहे. त्यांना दुसरीकडून अनुभवी फिरकीपटू आर. अश्विनची साथ मिळत आहे.
    मुंबई-दिल्लीमध्ये अव्वलस्थानासाठी चढाओढ...
  • दुसरीकडे गतविजेता मुंबई इंडियन्सचा संघ लौकिकास साजेशी कामगिरी नोंदवत आहे. मुंबई संघात स्टार खेळाडूंचा भरणा असून तो सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव आणि इशान किशन हे वरच्या फळीत धावा करत आहेत. तर हार्दिक पांड्या, केरॉन पोलार्ड आणि कृणाल पांड्या हे मधल्या फळीत फटकेबाजी करण्यात यशस्वी ठरले आहेत. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट आणि जेम्स पॅटिन्सन ही तिकडी प्रभावी मारा करत आहे. त्यांना फिरकीपटू राहुल चहरची चांगली साथ मिळत आहे.
  • मुंबई इंडिन्यसचा संभाव्य संघ -
  • क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, केरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या, जेम्स पॅटिन्सन, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह.
  • दिल्ली कॅपिटल्सचा संभाव्य संघ -
  • शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉइनिस, शिमरोन हेटमेयर, अक्षर पटेल, हर्षल पटेल, आर अश्विन, कागिसो रबाडा आणि एनरिच नोर्त्जे.
Last Updated : Oct 11, 2020, 4:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details