महाराष्ट्र

maharashtra

IPL २०२० : दोन यष्टीरक्षक कर्णधार आज एकमेकांना भिडणार; चेन्नईसमोर केकेआरची अग्निपरिक्षा

By

Published : Oct 7, 2020, 7:04 AM IST

आज आयपीएल २०२० मध्ये कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये सामना रंगणार आहे.

DREAM11 IPL 2020, MATCH 21: KKR VS CSK - PREVIEW
IPL २०२० : दोन यष्टीरक्षक कर्णधारांमध्ये आज भिडत; चेन्नईसमोर केकेआरची अग्निपरिक्षा

अबुधाबी - आज आयपीएल २०२० मध्ये २१ वा सामना दोन यष्टीरक्षक कर्णधारांमध्ये खेळला जाणार आहे. दोन्ही संघामध्ये स्टार खेळाडूंचा भरणा आहे. असे असले तरी त्यांना आतापर्यंत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. चेन्नईने मागील सामन्यात दमदार विजय मिळवला आहे. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास दुणावला आहे. तर दुसरीकडे कोलकाताला दिल्लीविरुद्धच्या पराभवातून धडा घेत विजयासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागणार आहेत.

कोलकाता नाइट रायडर्सचे स्टार खेळाडू कर्णधार दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, सुनिल नरेन यांना अद्याप आपली छाप सोडता आलेली नाही. कर्णधार दिनेश कार्तिकला तर चार सामन्यात केवळ ३७ धावाच करता आल्या आहेत. सलामीवीर सुनिल नरेनही अपयशी ठरला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, शुभमन गिल, नितीश राणा आणि इयॉन मार्गन सातत्याने धावा करत आहेत. आजच्या सामन्यात टॉम बँटनला संधी मिळाली तर कोलकाताची फलंदाजी अधिक मजबूत होईल. गोलंदाजीत कुलदीप यादव याचा अद्याप पूर्णपणे वापर करण्यात आलेला नाही. पॅट कमिन्स, कमलेश नागरकोटी, शिवम मावी यांना टिच्चून मारा करावा लागणार आहे.

दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जने, मागील सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबचा १० गडी राखून पराभव करत मोठा विजय मिळवला होता. चेन्नईचा फाफ डू प्लेसिस सातत्याने धावा करत आहे. मागील सामन्यात नाबाद अर्धशतक झळकावात शेन वॉटसनने आपण लयीत आल्याचे संकेत दिले आहेत. याशिवाय अष्टपैलू रवींद्र जडेजाही चांगली कामगिरी करत आहे. पण धोनीला अद्याप मोठी खेळी करता आलेली नाही. मागील सामना वगळता चेन्नईची मधली फळी अपयशी ठरली होती. पण अंबाती रायुडू संघात परतल्याने, चेन्नईची काही अंशी चिंता मिटली आहे. केदार जाधवला अद्याप सूर गवसलेला नाही. गोलंदाजीत लुंगी एनगिडीला आपल्या कामगिरीतील सातत्य राखता आलेले नाही. पण मागील सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती.

  • चेन्नई सुपर किंग्जचा संघ -
  • महेंद्रसिंह धोनी (कर्णधार, यष्टीरक्षक), मुरली विजय, अंबाती रायुडू, फाफ डु प्लेसिस, शेन वॉटसन, केदार जाधव, ड्वेन ब्रावो, रविंद्र जडेजा, लुंगी एनगिडी, दीपक चाहर, पीयूष चावला, इमरान ताहिर, मिशेल सॅटनर, जोश हेजलवुड, शार्दुल ठाकुर, सॅम करन, एन जगदीशन, केएम आसिफ, मोनू कुमार, आर साई किशोर, ऋतुराज गायकवाड आणि कर्ण शर्मा.
  • कोलकाता नाइट राइडर्सचा संघ -
  • दिनेश कार्तिक (कर्णधार यष्टीरक्षक), आंद्रे रसेल, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्यूसन, नितीश राणा, प्रसिद्ध कृष्णा, रिंकू सिंह, संदीप वारियर, शिवम मावी, शुबमन गिल, सिद्धेश लाड, सुनिल नरेन, पॅट कमिन्स, इयॉन मॉर्गन, वरुण चक्रवर्ती, टॉम बँटन, राहुल त्रिपाठी, ख्रिस ग्रीन, एम सिद्धार्थ, निखिल नाइक आणि अली खान.

ABOUT THE AUTHOR

...view details