दुबई - मुंबई इंडियन्ससाठी रोहित शर्मा एक महत्वपूर्ण खेळाडू आहे. तो फलंदाजीशिवाय संघाचे नेतृत्व सक्षमपणे सांभाळतो. पण चेन्नईविरुद्धच्या मागील सामन्यात तो अंतिम संघात नव्हता. स्नायू दुखावले गेल्याने, त्याला बाहेर बसावे लागले होते. पण हा सामना मुंबईने एकतर्फा १० गडी राखून जिंकला. आज राजस्थान रॉयल्सविरुद्ध मुंबईचा सामना होणार आहे. या सामन्यात देखील रोहित शर्माच्या खेळण्याबाबत साशंकता आहे.
चेन्नईविरुद्धच्या सामन्यादरम्यान, नाणेफेकसाठी केरॉन पोलार्ड आला. यामुळे रोहित शर्माची दुखापत गंभीर असल्याचे समोर आले. पण तो यातून किती सावरला आहे. याचे अपडेट अद्याप मिळू शकले नाहीत. अशात मुंबई इंडियन्सकडून देखील याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली आहे. पण रोहित शर्माची दुखापत संघासाठी चिंतेचा विषय ठरली आहे.