लंडन - इंग्लंडचा माजी फलंदाज आणि प्राणी सुरक्षा चळवळीचा कार्यकर्ता केवीन पीटरसन याने केरळमध्ये झालेल्या गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूबाबत रोष व्यक्त केला आहे. भुकेल्या गर्भवती हत्तीणीला फटाक्यांनी भरलेले अननस खाऊ घालणे ही अतिशय घृणास्पद बाब आहे, असे पीटरसन याने म्हटले आहे.
गर्भवती हत्तीणीला फटाक्यांनी भरलेले अननस खाऊ घालणे घृणास्पद: केविन पीटरसन - केविन पीटरसन केरळ हत्ती मृत्यू मत
दोन दिवसांपूर्वी केरळमधील पलक्कडमध्ये एका गर्भवती हत्तीणीचा फटाक्यांनी भरलेले अननस खाल्ल्याने मृत्यू झाला. गावकऱ्यांनीच या हत्तीणीला फटाके खाऊ घातल्याचा आरोप होत आहे. इंग्लंडचा माजी फलंदाज आणि प्राणी सुरक्षा चळवळीचा कार्यकर्ता केवीन पीटरसन याने केरळमध्ये झालेल्या गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूबाबत रोष व्यक्त केला आहे.
भारतातून मला गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूचे फोटो मिळाले. असे क्रूरपणे कोणी कसे वागू शकते? अशी पोस्ट पीटरसनने इन्टाग्रामला शेअर केली आहे. दोन दिवसांपूर्वी केरळमधील पलक्कडमध्ये एका गर्भवती हत्तीणीचा फटाक्यांनी भरलेले अननस खाल्ल्याने मृत्यू झाला. गावकऱ्यांनीच या हत्तीणीला फटाके खाऊ घातल्याचा आरोप होत आहे. वन विभागाने या प्रकरणी दोन नागरिकांना ताब्यातही घेतले आहे.
या घटनेबाबत क्रीडा विश्वातील अनेक खेळाडूंनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, भारताचा सलामीवीर रोहित शर्मा, माजी अष्टपैलू युवराज सिंग, फलंदाज अजिंक्य राहणे, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, फुटबॉल संघाचा कर्णधार सुनिल छेत्री यांनी देखील सोशल मिडीयावर संताप व्यक्त केला आहे.