लाहोर -शिस्त समितीचे अध्यक्ष फाजर मीरान यांनी 27 एप्रिलला उमर अकमलवरील प्रकरणाची सुनावणी निश्चित केली असून या संदर्भातील खेळाडू आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) या दोघांनाही नोटीस बजावली आहे. लाहोरमधील नॅशनल क्रिकेट अकादमी येथे सुनावणी होणार आहे. सुनावणी दरम्यान सोशल डिस्टन्स आणि उर्वरित सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे.
पाकिस्तानच्या उमर अकमलवर 'या' तारखेला सुनावणी - umar akmal fixing hearing news
पीसीबीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अकमलवर आचारसंहिता कलम 2.4.4चे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर अकमलने लाचलुचपत प्रतिबंधक न्यायालयात सुनावणीसाठी अपिल केले नाही म्हणून मंडळाने हा विषय शिस्त समितीकडे पाठवला. शिस्त समितीचे अध्यक्ष निर्णय घेईपर्यंत पीसीबी या विषयावर भाष्य करणार नाही.
पीसीबीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अकमलवर आचारसंहिता कलम 2.4.4चे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर अकमलने लाचलुचपत प्रतिबंधक न्यायालयात सुनावणीसाठी अपील केले नाही म्हणून मंडळाने हा विषय शिस्त समितीकडे पाठवला. शिस्त समितीचे अध्यक्ष निर्णय घेईपर्यंत पीसीबी या विषयावर भाष्य करणार नाही.
पाकिस्तान बोर्डाने भ्रष्टाचार विरोधी कलम ४.७१ नुसार अकमल याला निलंबित केले आहे. अकमलवर याआधीच फिक्सिंगचा आरोप करण्यात आला होता. 29 वर्षीय उमर अकमलने पाकिस्तानसाठी शेवटचा सामना मार्च 2019 मध्ये खेळला होता. त्याने आतापर्यंत 16 कसोटी, 121 एकदिवसीय आणि 84 टी-20 सामने खेळले आहेत.