महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

गंभीरपाठोपाठ वेंगसरकरांनीही चौथ्या क्रमांकासाठी लोकेश राहुलला दिली पंसती - BCCI

इंग्लंडच्या वातावरणात राहुलला खेळण्याचा अनुभव असून त्याच्याच जोरावर तो चांगली कामगिरी करु शकेल

दिलीप वेंगसरकर

By

Published : May 16, 2019, 11:54 PM IST

मुंबई - विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघात चौथ्या क्रमांकाच्या जागेसाठी मोठी चर्चा होत आहे. अनेक दिग्गज खेळाडू चौथ्या स्थानी फलंदाजीसाठी योग्य असलेल्या खेळाडूंची नावे सुचवित आहेत. भारताचे भारताचे माजी निवड समिती अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी चौथ्या क्रमांकासाठी लोकेश राहुलला पंसती दिली आहे.

वेंगसरकर म्हणाले, की ' विश्वकरंडक स्पर्धेत भारताने चौथ्या क्रमांकावर लोकेश राहुलला फलंदाजीस पाठवावे. या स्थानासाठी राहुल हा एक चांगला पर्याय तो असून इंग्लंडच्या वातावरणात खेळण्याचा अनुभव असून त्याच्याच जोरावर तो चांगली कामगिरी करु शकेल, असे मत वेंगसरकर यांनी मांडले आहे.'

यापूर्वी भारताचा माजी दिग्गज फलंदाज गौतम गंभीरनेही विश्वकरंडक स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी लोकेश राहुलच योग्य असल्याचे म्हटले होते. विश्वकरंडकात भारताचा पहिला सामना ५ जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

विश्वकरंडक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला भारतीय संघ

  • विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा.

ABOUT THE AUTHOR

...view details