लंडन - विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि भारत या सामन्यादरम्यानचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर येत आहे. या व्हिडिओत ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झम्पा चेंडूसोबत संशयास्पद कृती करताना दिसत असल्याने क्रिकेट विश्वात आणि सोशल मीडियात खळबळ माजली आहे. मात्र या प्रकरणात आयसीसीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
क्रिकेट विश्वात खळबळ, ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध केले बॉल टॅम्परिंग..? - ball tamper
अॅडम झम्पा चेंडूसोबत संशयास्पद कृती करताना दिसत असल्याने क्रिकेट विश्वात आणि सोशल मीडियात खळबळ माजली आहे.
एका वर्षापूर्वी म्हणजेच मार्च २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान झालेल्या बॉल टॅम्परिंग प्रकरणात दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर या दोघांवर १२ महिन्यांची कॅमेरुन बॅनक्रॉफ्टवर ९ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियामध्ये एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे अॅडम झम्पाच्या या कृत्यामुळे उलटसुलट चर्चा होताना दिसत आहे.
खेळल्या जात असलेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ३५३ धावांचे आव्हान ठेवले आहे.