महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

धोनी के आवाज में पेश है, जब कोई बात बिगड जाए...व्हिडिओ मात्र स्वतःच्या रिस्कवर पाहा - धोनीने गायलं गाण

धोनी २०१९ विश्वचषक स्पर्धेनंतर काही काळासाठी क्रिकेटपासून लांब आहे. सध्या तो आपल्या परिवारासोबत 'क्वॉलिटी टाइम' व्यतित करत आहे. धोनी आणि त्याची पत्नी साक्षीने गायक जेस्सी गिल याच्या ३१ व्या वाढदिवसानिमित्त एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीचे काही 'इनसाईड' फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Dhoni turns singer during gathering with friends, sings Jab Koi Baat Bigad Jaaye
धोनी के आवाज में पेश है, जब कोई बात बिगड जाए...व्हिडिओ मात्र स्वतःच्या रिस्कवर पाहा

By

Published : Dec 4, 2019, 9:43 PM IST

नवी दिल्ली - मागच्या काही काळापासून क्रिकेटपासून दूर असलेल्या भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा एक व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धोनी या व्हिडिओत गाणं गाताना दिसत आहे. नुकतीच धोनी आणि त्याची पत्नी साक्षीने त्यांच्या काही जवळच्या मित्रमंडळींना स्पेशल पार्टी दिली. यात बॉलीवुडसह टीव्ही जगतातील काही दिग्गज सहभागी झाले होते. या पार्टीतील हा व्हिडिओ आहे.

धोनी २०१९ विश्वचषक स्पर्धेनंतर काही काळासाठी क्रिकेटपासून लांब आहे. सध्या तो आपल्या परिवारासोबत 'क्वॉलिटी टाइम' व्यतित करत आहे. धोनी आणि त्याची पत्नी साक्षीने गायक जेस्सी गिल याच्या ३१ व्या वाढदिवसानिमित्त एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीचे काही 'इनसाइड' फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

धोनी त्या पार्टीमध्ये मित्रांसोबत मजा करताना दिसत आहे. या पार्टीमध्ये धोनीला काही जणांनी गाणं गाण्याची विनंती केली. ती धोनीने मान्यही केली. धोनीने कोणताही सूर न लावता हातात माइक घेऊन 'जब कोई बात बिगड जाए' हे गाणं गायलं.

पण हे गाणं बेसूर झाल्याचं म्हटले गेलं. त्यामुळे ज्या फिल्म प्रोड्युसरने हा व्हिडिओ शेअर केला, त्याच्यापुढे आपल्या रिस्कवरच हा व्हिडिओ पाहावा, असे म्हटले आहे. दरम्यान, धोनी त्या व्हिडिओत चांगल्या आवाजात गाताना दिसून येत आहे. धोनीचा हा अनोखा अंदाज त्याच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.

हेही वाचा -धावपटू योहान ब्लॅक केकेआर, आरसीबी संघाकडून आयपीएल खेळण्यासाठी इच्छुक

हेही वाचा -मोहम्मद शमी आयसीसी कसोटी क्रमवारीत 'टॉप १०'मध्ये

ABOUT THE AUTHOR

...view details