महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL २०२१ : दिल्लीविरुद्धच्या सामन्यासाठी धोनी तयार; नेटमध्ये तुफान फटकेबाजी, पाहा व्हिडिओ - ms dhoni batting video

चेन्नई सुपर किंग्जने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून धोनीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत धोनी नेटमध्ये सराव करताना पाहायला मिळत आहे. यात तो उंच फटके मारताना दिसून येत आहे.

dhoni-shows-his-batting-skills-ahead-dc-clash
IPL २०२१ : दिल्लीविरुद्धच्या सामन्यासाठी धोनी तयार, नेटमध्ये केली जोरदार फटकेबाजी

By

Published : Apr 10, 2021, 5:17 PM IST

मुंबई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचा दुसरा सामना आज चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या संघात खेळला जाणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होणाऱ्या या सामन्याला काही तासातच सुरूवात होणार आहे. या सामन्याआधी चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी सराव सत्रात तुफान फटकेबाजी करताना पाहायला मिळाला. धोनीची फटकेबाजी पाहून दिल्ली संघाला, 'बचके रहना रे बाबा', असाच सल्ला द्यावा लागेल.

चेन्नई सुपर किंग्जने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून धोनीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत धोनी नेटमध्ये सराव करताना पाहायला मिळत आहे. यात तो चौफेर उंच फटके मारताना दिसून येत आहे.

दरम्यान, धोनीसाठी आयपीएलचा मागील हंगाम चांगला ठरला नाही. धोनीने ११६.२८ च्या स्ट्राइट रेटने २५ च्या सरासरीने २०० धावा केल्या. धोनी अपयशी ठरल्याने, चेन्नई संघाच्या कामगिरीवर याचा परिणाम झाला. चेन्नईचा संघ आयपीएल इतिहासात प्रथमच प्ले ऑफ फेरी गाठू शकला नाही. ते गुणतालिकेत ७ व्या स्थानी राहिले. यंदाच्या हंगामात ते अपयश पुसून टाकण्यासाठी सज्ज झाले आहेत. चेन्नईसह धोनीची कामगिरी या हंगामात कशी राहणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा -IPL २०२१ : मॅक्सवेल या हंगामात किती धावा करेल, इरफान पठाणची भविष्यवाणी

हेही वाचा -IPL २०२१ : हार्दिक पांड्या अनफिट?, मुंबई इंडियन्सची चिंता वाढली

ABOUT THE AUTHOR

...view details