चेन्नई -आयपीएलमध्ये मंगळवारी चेन्नई सुपरकिंग्ज संघाने कोलकाता नाईट रायडर्सचा ७ गडी राखून पराभव केला. या विजयासह चेन्नई आयपीएलच्या गुणतालिकेतील आपले अव्वल स्थानही परत मिळवले. या विजयानंतर खुश होत चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या संघातील २ दिग्गज गोलंदाजांवर स्तुतीसुमने उधळली आहेत.
धोनी म्हणतो, हरभजन सिंग आणि इम्रान ताहीर हे जुन्या वाईनसारखे - imran Tahir
महेंद्रसिंग धोनीने आपल्या संघातील २ दिग्गज गोलंदाजांवर उधळली स्तुतीसुमने
धोनीने आपल्या संघातील फिरकी गोलंदाज हरभजन सिंग आणि इम्रान ताहीर यांचे कौतुक करत म्हटले की. हे दोघे जुन्या वाइनसारखे आहेत. जसजसे दिवस जात आहेत, तसतसे हे दोन्ही खेळाडू परिपक्व होत आहेत. तसेच वय ही एक फक्त संख्या असल्याच्या या दोघांनी दाखवुन दिले असल्याचे धोनी म्हणाला.
इम्रान ताहीरने १२ व्या मोसमात चेन्नईसाठी ६ सामने खेळताना ९ विकेट घेतले आहे तर, हरभजनने ४ सामन्यांमध्ये ७ विकेट पटकावले आहेत. या मोसमात इम्रान हा आतापर्यंतचा चेन्नईसाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.