रांची -कोरोना व्हायरसच्या हाहाकारामुळे जगातील सर्व मोठ्या स्पर्धा पुढे ढकलल्या गेल्या आहेत. क्रिकेटमधील श्रीमंत असलेली आयपीएलही यंदा होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे सर्वांना प्रतीक्षा असलेले महेंद्रसिंह धोनीचे पुनरागमनही लांबणीवर गेले आहे. या स्पर्धेवर धोनीचे भवितव्य अवलंबून होते. मात्र, तो यंदाच्या टी-२० स्पर्धेत खेळणार, असा आशावाद त्याचे बालपणीचे प्रशिक्षक रंजन बॅनर्जी यांनी व्यक्त केला आहे.
“धोनीला टी-२० वर्ल्डकप खेळण्याची संधी मिळणार” - महेंद्रसिंह धोनी लेटेस्ट न्यूज
‘सद्यस्थितीत आयपीएलची शक्यता नाही. आम्हाला बीसीसीआयच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी लागेल. धोनीची परिस्थिती कठीण आहे, पण माझ्या सहाव्या इंद्रियानुसार त्याला टी-२० विश्वकरंडक खेळण्याची संधी मिळेल. आणि हा त्याचा शेवटचा विश्वकरंडक असेल’, असे बॅनर्जी यांनी म्हटले.
‘सद्यस्थितीत आयपीएलची शक्यता नाही. आम्हाला बीसीसीआयच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी लागेल. धोनीची परिस्थिती कठीण आहे, पण माझ्या सहाव्या इंद्रियानुसार त्याला टी-२० विश्वकरंडक खेळण्याची संधी मिळेल. आणि हा त्याचा शेवटचा विश्वकरंडक असेल’, असे बॅनर्जी यांनी म्हटले. ‘चेन्नईहून परतल्यानंतर मी त्याच्याशी बोललो. तो फिटनेस प्रशिक्षण घेत आहे आणि पूर्ण तंदुरुस्त आहे’, असेही बॅनर्जी म्हणाले आहेत.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसारामुळे आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. या स्पर्धेसंदर्भात बीसीसीआय आणि आठही फ्रँचायझी मालकांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक होणार होती. पण ती रद्द करण्यात आली होती.