मुंबई - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत अफगाणिस्तान विरुध्दच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनींने संथ खेळ केला. यावर सचिन तेंडूलकरसह अनेकांनी टीका केली. मात्र, ही टीका धोनीच्या चाहत्यांना रुचलेली नाही. तेव्हा धोनी चाहत्यांनी सचिन तेंडूलकरला ट्रोल करावयास सुरूवात केली. धोनीच्या चाहत्यांनी सचिनला चांगलेच खडेबोल सुनावले आहे.
'दोन विश्वकरंडक स्पर्धेत सचिनने २२ धावा केल्या. तरीही काही लोक सचिनला भगवान मानतात, तुमची हिम्मत कशी झाली धोनीवर टीका करण्याची' असे खडेबोल एका चाहत्याने सचिनला सुनावले आहे.
काही चाहत्यांनी तर, सचिन तु स्वतःसाठी खेळत होता. तर धोनी संघ आणि देशासाठी खेळत आहे. असे सांगितले आहे.
धोनीमुळेच आपण विश्वकरंडक जिंकू शकलो. जे तुम्ही तुमच्या संपूर्ण करिअरमध्ये जिंकू शकला नाही. असा टोमणा एका चाहत्याने सचिनला मारला आहे.
तेंडूलकर तुम्ही तुमच्या बाबतीत काय विचार करता? जर धोनी नसता तर तुम्ही संघात नसला असता असे एका चाहत्याने म्हटले आहे.
सचिन तुम्ही तुमचा स्टेट्स पाहा, तुम्ही लेजेंड असाल पण धोनी क्रिकेटचा देव आहे. असे एका चाहत्याने लिहले आहे.
दरम्यान, महेंद्र सिंह धोनीने अफगाणिस्तान विरुध्दच्या सामन्यात ३६ चेंडूत २४ धावा केल्या. तर केदार जाधव याने ४८ चेंडूत ३१ धावा केल्या. या दोघांनी ५ व्या विकेटसाठी ८४ चेंडूत ५७ धावांची भागिदारी केली. भारताने हा सामना ११ धावांनी जिंकला. मात्र, या सामन्यानंतर धोनीने केलेल्या संथ खेळीवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली.