दुबई -दुखापतीमुळे आयपीएलच्या तेराव्या पर्वातून बाहेर पडलेल्या लेगस्पिनर अमित मिश्राच्या जागी दिल्ली कॅपिटल्सने प्रवीण दुबेशी करार केला आहे. फ्रेंचायझीने सोमवारी याविषयी माहिती दिली.
अमित मिश्राच्या जागी दिल्लीने 'या' खेळाडूला दिले संघात स्थान - अमित मिश्रा लेटेस्ट न्यूज
दिल्ली कॅपिटल्सने प्रवीण दुबेशी करार केला आहे. फ्रेंचायझीने सोमवारी याविषयी माहिती दिली. कर्नाटकचा फिरकीपटू दुबेने आपल्या राज्यासाठी १४ घरगुती टी-२० सामने खेळले आहेत
कर्नाटकचा फिरकीपटू दुबेने आपल्या राज्यासाठी १४ घरगुती टी-२० सामने खेळले आहेत आणि ६.८७च्या सरासरीने १६ बळी घेतले आहेत. अमित ३ ऑक्टोबर रोजी शारजाह येथे कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात जखमी झाला होता. यामुळे तो आयपीएलमधून बाहेर पडला आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे.
आयपीएलमध्ये तीन हॅटट्रिक घेणाऱ्या अमितने या मोसमात फक्त तीन सामने खेळले असून त्यात तीन बळी घेतले आहेत. "दुखापत इतकी तीव्र होईल याची मला कल्पना नव्हती. मला वाटले की ही दुखापत एक-दोन सामन्यांसाठी असेल. मी खेळत गेलो आणि मी माझे शंभर टक्के योगदान दिले. ही तंदुरुस्तीशी संबंधित दुखापत नाही म्हणून मी ठीक आहे", असे अमिंत मिश्राने सांगितले होते.