नवी दिल्ली -इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल) फ्रेंचायझी दिल्ली कॅपिटल्सने ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज रायन हॅरिसला आपला नवीन गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. ४० वर्षीय हॅरिस १९ सप्टेंबरपासून सुरू होणार्या आयपीएलसाठी यूएईमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघात सामील होईल.
ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज जेम्स होप्स कौटुंबिक कारणास्तव यूएईला जाऊ शकणार नाही. त्यामुळे तो गोलंदाजीच्या प्रशिक्षकाची भूमिका पार पाडू शकणार नाही. होप्स २०१८ आणि २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक होता.