महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL २०२१ : श्रेयस अय्यर आयपीएलला मुकला; पंत दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार - Shreyas Iyer ruled out IPL 2021

श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत दिल्ली संघाची धुरा पंतकडे सोपवण्याचा निर्णय दिल्ली संघाच्या व्यवस्थापनाने घेतला आहे. दरम्यान, पंतने याआधी 2017 साली सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत दिल्लीच्या संघाचे नेतृत्व केले आहे.

Delhi Capitals name Rishabh Pant captain for IPL 2021, Shreyas Iyer ruled out with shoulder injury
IPL २०२१ : श्रेयस अय्यर आयपीएलला मुकला; पंत दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार

By

Published : Mar 31, 2021, 1:38 AM IST

मुंबई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला सुरूवात होण्याआधीच दिल्ली कॅपिटल्स संघाचा मोठा धक्का बसला आहे. दिल्लीच्या संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर संपूर्ण स्पर्धेला मुकणार आहे. श्रेयसच्या अनुपस्थितीत आता दिल्ली कॅपिटल्सची धुरा आता ऋषभ पंतच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे.

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली होती. यात श्रेयसच्या खांद्याचे हाड निखळले होते. या दुखापतीतून सावरण्यासाठी श्रेयसला मोठा कालवधी लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तो आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला मुकला आहे.

श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत दिल्ली संघाची धुरा पंतकडे सोपवण्याचा निर्णय दिल्ली संघाच्या व्यवस्थापनाने घेतला आहे. दरम्यान, पंतने याआधी 2017 साली सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत दिल्लीच्या संघाचे नेतृत्व केले आहे.

ऋषभ पंत सद्या सुसाट फॉर्मात आहे. त्याने ऑस्ट्रेलिया दौरा गाजवला. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही त्याने चमकदार कामगिरी केली. आता तो आयपीएलमध्ये देखील हीच लय कायम राखणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कर्णधारपदाची जबाबदारी दिल्यानंतर पंतच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असणार आहे.

हेही वाचा -IPL २०२१ : पंजाब किंग्जसाठी गूड न्यूज; मोहम्मद शमी झाला फिट

हेही वाचा -IPL २०२१ : मुंबईत दाखल होताच KKRच्या प्रशिक्षकाचे ट्विट, म्हणाले...

ABOUT THE AUTHOR

...view details