नवी दिल्ली - आयपीएल २०२१ च्या हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाने नवी जर्सी लॉन्च केली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत दिल्लीच्या संघाने नव्या जर्सीचे अनावरण केले आहे. या हंगामात दिल्लीचा संघ नव्या रंगात दिसून येणार आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या नव्या जर्सीवर गडद निळा आणि लाल रंगाचा वापर करण्यात आला आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघाच्या मॅनेजमेंटने, दिल्लीच्या फॅन्सच्या हातून नव्या जर्सीचे अनावरण केले. दिल्लीच्या मोजक्या फॅन्सना फ्रेंझायजी ऑफिसमध्ये बोलावण्यात आले. त्यांच्या हातून नव्या जर्सीचे अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, या फॅन्ससोबत दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि शिखर धवन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गप्पा मारल्या.
दरम्यान, आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला ९ एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. हंगामाचा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध रॉयल चॅलेजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. तर दिल्लीचा पहिला सामना चेन्नईशी होणार आहे.