दिल्ली - फिरोजशाह कोटला मैदानावर झालेल्या पाचव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्स संघाचा ६गडी राखून पराभव केला. चेन्नईने आयपीएलमध्ये सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने २० षटकात १४७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात चेन्नईने हे आव्हान ४ गडी गमावून १९.४ षटकात पूर्ण केले.
१४८ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या सीएसकेची सुरुवात खराब झाली. अंबाती रायुडू ५ धावांवर बाद झाला. त्यानंतर शेन वॉटसनची आक्रमक ४४ धावांची खेळी केली. मध्यक्रमात सुरेश रैना (३०), केदार जाधव (२७) महेंद्र सिंह धोनी (३२) धावांची खेळी केली. दिल्लीकडून अमित मिश्राने ३५ धावांत २ गडी बाद केले. रबाडा आणि शर्माला एक गडी बाद करता आला.
ड्वेन ब्राव्हो विजयाचा हिरो ठरला त्याने चौकार ठोकून संघाला विजय मिळवून दिला. तसेच गोलंदाजीत त्याने ३३ धावा देऊन ३ गडी बाद केले होते.