दुबई - दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा दुखापतीमुळे आयपीएलच्या सध्याच्या सत्रातून बाहेर पडला आहे. दिल्ली कॅपिटल्सने ही माहिती दिली. ७ ऑक्टोबरला प्रशिक्षण सत्रात इशांतचे स्नायू ताणले गेले होते. इशांतपूर्वी अमित मिश्राही आयपीएलमधून बाहेर पडला आहे.
दिल्लीच्या अडचणीत वाढ, 'हा' खेळाडू आयपीएलबाहेर - ishant sharma delhi capitals news
यंदाच्या हंगामात ३२ वर्षीय इशांतने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सामना खेळला होता. या सामन्यात त्याला एकही बळी मिळाला नाही. इशांतपूर्वी अमित मिश्राही आयपीएलमधून बाहेर पडला आहे.
![दिल्लीच्या अडचणीत वाढ, 'हा' खेळाडू आयपीएलबाहेर Delhi capitals fast bowler ishant sharma ruled out of ipl 2020](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9160236-thumbnail-3x2-ffff.jpg)
यंदाच्या हंगामात ३२ वर्षीय इशांतने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सामना खेळला होता. या सामन्यात त्याला एकही बळी मिळाला नाही. "दिल्लीचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माला ७ ऑक्टोबरला दुबई येथे झालेल्या संघ प्रशिक्षण सत्रात गोलंदाजी करताना डाव्या बरगडीत वेदना जाणवत होती. या तपासणीनंतर त्याचे स्नायू ताणले गेले असल्याचे समजले. दुर्दैवाने तो यंगाच्या आयपीएलमधीप उर्वरित सामन्यांना मुकणार आहे", असे संघाने सांगितले.
इशांतने भारताकडून ९७ कसोटी, ८० एकदिवसीय आणि १४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.