नवी दिल्ली - टीम इंडियाचा युवा गोलंदाज दीपक चहरने बांगलादेश विरुध्दच्या तिसऱ्या व निर्णायक टी-२० सामन्यात हॅट्ट्रिकसह ६ बळी टिपले. चहरच्या या कामगिरीमुळे टीम इंडियाने ३ सामन्यांची टी-२० मालिका २-१ ने जिंकली. या सामन्यात दीपकने भेदक मारा केला. त्याने त्याच्या ३.२ षटकांमध्ये केवळ ७ धावा दिल्या आणि तब्बल ६ बळी टिपले. त्यात एका हॅटट्रिकदेखील घेतली. आयपीएलची मिस्ट्री गर्ल ठरलेली चहरची बहिण मालतीने 'त्या' हॅट्ट्रिकचा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकांऊटवरुन शेअर केला आहे.
चहरने बांगलादेश विरुध्द हॅट्ट्रिकसह ६ गडी बाद करत टी-२० इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजीचा विश्वविक्रम आपल्या नावे केला. तसेच तो भारतासाठी टी-२० मध्ये हॅट्ट्रिक घेणारा पहिला पुरुष गोलंदाज ठरला. त्याच्या या कामगिरीचा एक व्हिडिओ तिची बहिण मालती चहरने शेअर केला आहे.
मालती चहर ही दीपक चहरची बहिण असून ती अनेकवेळा इंडियन प्रीमीयर लीगच्या सामन्याला मैदानावर हजर असायची. मालती आणि दीपक या दोघांचे नाते अतिशय खेळीमेळीचे आहे. ते दोघेही कायम एकमेकांची मस्करी करत असतात.