मुंबई -चेन्नई सुपर किंग्जच्या १३ सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आयपीएलबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. या बातमीनंतर बीसीसीआयनेही १३ सदस्यांना संसर्ग झाल्याची पुष्टी केली. यात दोन खेळाडू असल्याचेही बीसीसीआयने सांगितले. मात्र, मंडळाने या दोन खेळाडूंची नावे जाहीर केलेली नाहीत. पण, माध्यमांच्या वृत्तानुसार चेन्नईचा गोलंदाज दीपक चहरचे यात नाव आहे.
''तू खरा लढवय्या आहेस'', सीएसकेच्या कोरोनाग्रस्त खेळाडूला बहिणीकडून धीर - deepak chahars sister news
दीपकची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याची बहिण मालती चहरने त्याच्यासाठी खास संदेश दिला आहे. ''तू खरा लढवय्या आहेस. तू जन्मापासून लढाऊ वृत्तीचा आहेस. काळ्या रात्रीनंतरचा दिवस हा कायमच आयुष्यात प्रकाश टाकतो. तू देखील या आजारातून लवकर पुनरागमन करशील. तुझी गर्जना ऐकण्यासाठी आम्ही सारेच उत्सुक आहोत'', असे मालतीने ट्विट केले.
दीपकची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याची बहिण मालती चहरने त्याच्यासाठी खास संदेश दिला आहे. ''तू खरा लढवैय्या आहेस. तू जन्मापासून लढाऊ वृत्तीचा आहेस. काळ्या रात्रीनंतरचा दिवस हा कायमच आयुष्यात प्रकाश टाकतो. तू देखील या आजारातून लवकर पुनरागमन करशील. तुझी गर्जना ऐकण्यासाठी आम्ही सारेच उत्सुक आहोत'', असे मालतीने ट्विट केले.
महाराष्ट्राचा खेळाडू आणि सीएसकेचा फलंदाज ऋतुराज गायकवाडलाही कोरोनाची लागण झाली आहे. तत्पूर्वी, अनुभवी फलंदाज सुरेश रैनाने वैयक्तिक कारणामुळे यंदाच्या आयपीएलमधून माघार घेतली. आयपीएलचे तेरावे पर्व १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबरदरम्यान यूएईत रंगणार आहे. कोरोना प्रकरणांमुळे आयपीएलच्या वेळापत्रकाची घोषणा लांबणीवर गेली आहे. यूएईत दाखल झालेल्या इतर संघांच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. मात्र, चेन्नई सुपर किंग्ज अद्यापही प्रशिक्षणाच्या प्रतीक्षेत आहे.