महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

चाहरचा कहर सुरूच! तीन दिवसांत घेतली दुसरी हॅट्ट्रिक - दीपक चाहर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी न्यूज

रविवारी झालेल्या बांगलादेशविरूद्धच्या अंतिम आणि तिसऱ्या टी-२० सामन्यात चाहरने भारतासाठी या क्रिकेट प्रकारातील पहिली हॅट्ट्रिक नोंदवली होती.  या सामन्यात त्याने ७ धावा देत ६ गडी बाद केले होते आणि विश्वविक्रम घडवला होता.

चाहरचा कहर सुरूच! तीन दिवसांत घेतली दुसरी हॅट्ट्रिक

By

Published : Nov 12, 2019, 6:08 PM IST

नवी दिल्ली -भारताचा वेगवान गोलंदाज आणि बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात हॅट्ट्रिक नोंदवणाऱ्या दीपक चाहरने आपला कहर सुरूच ठेवला आहे. सध्या सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मध्ये राजस्थानकडून खेळत असताना चाहरने परत एकदा हॅट्ट्रिक घेतली. या सामन्यात त्याने १८ धावा देत ६ च्या सरासरीने चार विकेट्स घेतल्या.

हेही वाचा -'त्या' ऐतिहासिक कसोटीपूर्वी टीम इंडिया इंदोरमध्ये घेणार 'गुलाबी' प्रशिक्षण

रविवारी झालेल्या बांगलादेशविरूद्धच्या अंतिम आणि तिसऱ्या टी-२० सामन्यात चाहरने भारतासाठी या क्रिकेट प्रकारातील पहिली हॅट्ट्रिक नोंदवली होती. या सामन्यात त्याने ७ धावा देत ६ गडी बाद केले होते आणि विश्वविक्रम घडवला होता.

विदर्भविरूद्धच्या सामन्यात चाहरने फलंदाज दर्शन नलकंडे, श्रीकांत वाघ आणि अक्षय वाडकर यांना बाद करत ही हॅट्ट्रिक नोंदवली. त्याच्या या तुफानी गोलंदाजीमुळे विदर्भाचा संघ १३ ओव्हरमध्ये ९ गडी गमावून ९९ धावाच करू शकला. विशेष म्हणजे चाहरनेने एकाच ओव्हरमध्ये चार फलंदाजांना तंबूत धाडले आहे.

आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात हॅट्ट्रिक मिळवणारा दीपक चाहर पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. सोबतच त्याने टी-२० क्रिकेट प्रकारात गोलंदाजीमध्ये सर्वोत्तम फिगर नोंदवली. चाहरने या सामन्यात केवळ ७ धावा देत ६ गडी बाद केले. याआधी हा विक्रम श्रीलंकेच्या अजंता मेंडिसच्या नावावर होता. २०१२ मध्ये त्याने केवळ ८ धावा देत ६ गडी बाद करण्याची किमया केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details