नागपूर - भारत विरुद्ध बांगलादेश संघात जामठा मैदानावर पार पडलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक टी-२० सामन्यात भारताने ३० धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने ३ सामन्यांची टी-२० मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. निर्णायक सामन्याचा हिरो ठरला दीपक चहर.
बांगलादेश विरुध्दच्या निर्णायक सामन्यात दीपक चहरने ३.२ षटके गोलंदाजी करताना केवळ ७ धावा देत या ६ विकेट घेतल्या. तो भारताकडून टी-२० क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. या विक्रमाबरोबरच त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करण्याचाही विक्रम रचला आहे.
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये गोलंदाजीत सर्वोत्तम प्रदर्शन -
- दीपक चाहर - ६ विकेट - ७ धावा - (विरुद्ध बांगलादेश, नागपूर, २०१९)
- अजंता मेंडिस - ६ विकेट - ८ धावा (विरुद्ध झिम्बाब्वे, हॅम्बॅन्टोटा, २०१२)
- अजंता मेंडिस - ६ विकेट - १६ धावा (विरुद्ध ऑस्ट्रेलिया, पाल्लेकेले, २०११)
- युजवेंद्र चहल - ६ विकेट - २५ धावा (विरुद्ध इंग्लंड, बंगळूरु, २०१७)