ऑकलंड - कोरोना व्हायरसमुळे आयसीसीने यावर्षी होणारी पुरुष टी-20 विश्वकरंडक स्पर्धा पुढे ढकलली आहे. महिलांची विश्वकरंडक स्पर्धाही पुढील वर्षी होणार आहे. मात्र, याबाबतचा निर्णय पुढील दोन आठवड्यांत घेण्यात येणार असल्याचे न्यूझीलंड बोर्डाचे अध्यक्ष ग्रेग बार्क्ले यांनी म्हटले आहे.
बार्क्ले म्हणाले, ''ही स्पर्धा पुढे ढकलण्याची गरज भासल्यास आम्हाला लवकरात लवकर त्याबद्दल माहिती मिळायला हवी. जर या स्पर्धेचे आयोजन करायचे झाले तर, फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या या जागतिक स्तरीय स्पर्धेसाठी आम्ही सर्व योगदान देऊ शकू."
आठ संघांची ही एकदिवसीय स्पर्धा 6 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान न्यूझीलंडमध्ये खेळली जाईल. ऑकलंड, हॅमिल्टन, टॉरंगा, वेलिंग्टन, ख्राईस्टचर्च आणि डुनेडिन येथे ही स्पर्धा खेळली जाईल.
बार्क्ले यांनी म्हटले आहे, ''न्यूझीलंड सध्या जगातील एकमेव असा देश आहे जो चाहत्यांनी भरलेल्या स्टेडियममध्ये सामन्यांचे आयोजन करू शकेल. तथापि, पुढील उन्हाळ्यात स्पर्धेचे आयोजन करण्यापूर्वी काही अडथळे दूर केले पाहिजेत.''
ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि भारत या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. आठ संघ रॉबिन राऊंडमध्ये खेळतील आणि अव्वल चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.