महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

चौथ्या क्रमांकावर धोनीला पाठवा, डीन जोन्सचा भारतीय संघाला सल्ला

डीन जोन्सच्या मते रविंद्र जाडेजाला भारतीय संघात स्थान मिळायला हवे

चौथ्या क्रमांकावर धोनीला पाठवा, डीन जोन्सचा भारतीय संघाला सल्ला

By

Published : Jun 29, 2019, 7:21 PM IST

लंडन - चौथ्या स्थानी फलंदाजीसाठी भारतीय संघाने अनेक प्रयोग केले, तरीही योग्य खेळाडू भारताला मिळालेला नाहीय. यावर बोलताना ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू डीन जोन्स यांनी चौथ्या क्रमांकासाठी महेंद्रसिंह धोनीला फलंदाजीस पाठवण्याचा सल्ला भारतीय संघाला दिला आहे. तसेच रवींद्र जाडेजाला भारतीय संघात स्थान मिळायला हवे असे मत व्यक्त केलंय.

धोनी

शिखर धवन दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडल्याने लोकेश राहुल सलामीला येत आहे. त्यामुळे भारतीय संघात चौथ्या क्रमांकासाठी विजय शंकरला संधी देण्यात आली होती. मात्र त्याला आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये अपेक्षित कामगिरी करता आली नाहीय. त्यामुळे अनेकांनी चौथ्या क्रमांकासाठी महेंद्रसिंह धोनीला आणि ऋषभ पंत पंसती दर्शवली आहे.

सुरुवातीच्या ३ फलंदाजांनी फ्लॉप शो केला तर बाकीच्या खेळाडूंवर दडपण येऊन ते चांगली कामगिरी करू शकत नाहीत. त्यासाठी चौथ्या क्रमांकावर अनुभवी खेळाडूची गरज आहे. या क्रमांकावर धोनी खेळला तर फलंदाजीचा क्रम मजबूत होईल, असे मत यापूर्वीच भारताचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी मांडले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details