मुंबई -इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये महेंद्रसिंह धोनीची कामगिरी अजूनही भारतीय संघात पुनरागमन करण्याच्या बाबतीत खूपच महत्त्वाची आहे असे ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज आणि समालोचक डीन जोन्स यांना वाटते. कोरोनामुळे मिळालेली विश्रांती माजी कर्णधारांसाठी फायदेशीर ठरू शकेल, असेही जोन्स म्हणाले.
जोन्स यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले, "या क्षणी असे दिसते, की भारतीय निवडकर्ते यष्टिरक्षक म्हणून ऋषभ पंत आणि लोकेश राहुल यांच्यासमवेत आहेत. धोनी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत असेल, तर तो संघात येऊ शकतो. परंतु आयपीएलमधील त्याची कामगिरी चांगली नसेल, तर संघाचे दरवाजे त्याच्यासाठी नक्कीच बंद होतील. कोरोनामुळे मिळालेली विश्रांती त्याच्यासाठी चांगली असेल आणि ती विश्रांती पुनरागमनासाठी खूप महत्त्वाची ठरेल. जसे जसे आपले वय वाढते तसे पुनरागमन करणे कठीण होत जाते."