महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

शारजाच्या जागी अबुधाबीत खेळली जाईल T10 लीग - host

शेख झायेद क्रिकेट मैदानावर पुढील ५ वर्षे टी-१० क्रिकेटचे आयोजन करण्यात येणार आहे

T10 league

By

Published : Mar 22, 2019, 7:52 PM IST

युएई - अबुधाबीच्या शेख झायेद क्रिकेट स्टेडियममध्ये २०१९ पासून पुढील ५ वर्षांसाठी टी-१० क्रिकेटचे आयोजन केले जाणार आहे. अबुधाबी क्रिकेटने मंगळवारी अबुधाबी खेळ परीषद आणि अबुधाबीच्या संस्कृतिक आणि पर्यटन विभागसोबत पुढील ५ वर्षे या टी-१० लीगच्या आयोजनाचा करार केला आहे.

यावेळी दुबईच्या समुद्र किनाऱ्यावर एका टी-१० सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. यात दक्षिण आफ्रिकेचा धडकेबाज फलंदाज कॉलिन इंग्राम, गोलंदाज आंद्रे फ्लेचर आणि क्रिकेटर लुक रोंचीने सहभाग घेतला होता.

टी-१० स्पर्धा पहिल्यांदा २०१७ मध्ये संयुक्त अरब अमिरातीच्या शारजा क्रिकेट मैदानावर खेळली गेली होती. ज्यात ८ संघानी सहभाग घेतला होता. यावेळी टी-१० स्पर्धेचा पहिला सामना २३ ऑक्टोंबरला तर अखेरचा सामना ३ नोव्हेंबरला खेळला जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details