बंगळुरू - युनिव्हर्सल स्पोर्टबिज फॅशन ब्रँड व्रॉग्न अॅक्टिव्हने आपल्या नव्या ब्रँड अॅम्बेसेडरची घोषणा केली. दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज ए.बी. डिव्हिलीयर्स आता या कंपनीचा ब्रँड अॅम्बेसेडर असणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली देखील व्रॉग्न अॅक्टिव्हचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. क्रिकेटमधील हे दोन्ही दिग्गज फलंदाज इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून एकत्र खेळतात.
विराटसोबत आता डिव्हिलीयर्सही व्रॉग्न अॅक्टिव्हचा ब्रँड अॅम्बेसेडर - ए.बी. डिव्हिलीयर्स लेटेस्ट न्यूज
दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज ए.बी. डिव्हिलीयर्स व्रॉग्न अॅक्टिव्हचा ब्रँड अॅम्बेसेडर झाला आहे. क्रिकेटमधील हे दोन्ही दिग्गज फलंदाज इंडियन प्रीमियर लीगमध्ये आरसीबीकडून खेळतात.
विराटसोबत आता डिव्हिलीयर्सही व्रॉग्न अॅक्टिव्हचा ब्रँड अॅम्बेसेडर
हेही वाचा -कोरोना व्हायरसमुळे फ्रेंच ओपन स्पर्धाही पुढे ढकलली
'आरसीबीचा सहकारी विराटसोबत व्रॉग्न अॅक्टिव्हमध्ये सामील झाल्याने मला खूप आनंद झाला आहे. आम्ही अनेक वर्षांपासून आयपीएल दरम्यान ड्रेसिंग रूममध्ये एकत्र होतो. आता खेळाशिवाय फॅशन आणि स्टाईलबद्दल चर्चा करणे मनोरंजक असेल', असे या ब्रँडशी जोडल्यानंतर डिव्हिलीयर्सने म्हटले आहे.