महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'या' कारणामुळे डीडीसीएने कोहली, सेहवाग आणि गंभीरचा सत्कार केला रद्द - ऑस्ट्रेलिया

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, वीरेंदर सेहवाग आणि गौतम गंभीर यांचा सत्कार होणार होता. परंतु, आता पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यामुळे हा सत्कार सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोहली-सेहवाग

By

Published : Mar 12, 2019, 3:36 PM IST

दिल्ली- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बुधवारी दिल्ली येथे ५वा एकदिवसीय सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, वीरेंदर सेहवाग आणि गौतम गंभीर यांचा सत्कार होणार होता. परंतु, आता पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यामुळे हा सत्कार सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

डीडीसीएचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले, की विराट कोहली, वीरेंदर सेहवाग आणि गौतम गंभीर यांचा सत्कार करण्याचे नियोजन होते. परंतु, मंडळाच्या बैठकीत हा सत्कार सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. आम्ही दिल्ली पोलिसांच्या शहीद निधीमध्ये १० लाखांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. सामन्याची ९० टक्के तिकिटे विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. सगळी तिकिटे विकण्यात आली आहेत. डीडीसीएने पहिल्यांदाच राज्यातील सर्व माजी खेळाडूंना २ व्हीआयपी तिकिटे देण्याचा निर्णय घेतला आहे.

बीसीसीआयनेही याआधी आयपीएलचा उद्धाटन समारोह रद्द केला आहे. सोहळ्यात खर्च करण्यात येणारा निधी हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी दान करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाच्या खेळाडूंनीही नागपूर आणि रांची झालेल्या सामन्याचे मानधन राष्ट्रीय सुरक्षा निधीला दिले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details