नवी दिल्ली - कोरोनाव्हायरसमुळे 14 एप्रिलपर्यंत भारतात लॉकडाउन सुरू आहे. या व्हायरसमुळे क्रिकेटच्या सर्व स्पर्धांवर लगाम घातला गेला असला तरी, क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या कालावधीत 7 एप्रिलपासून दररोज डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर भारतासह इतर काही संस्मरणीय क्रिकेट सामने दाखवण्यात येणार आहेत.
खुशखबर!..7 एप्रिलपासून होणार क्रिकेट सुरू..भारत सरकारचा निर्णय
लॉकडाउन कालावधीत 7 एप्रिलपासून दररोज डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर भारतासह इतर काही संस्मरणीय क्रिकेट सामने दाखवण्यात येणार आहेत.
भारत सरकार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) हा निर्णय घेतला आहे. या कालावधीत, क्रिकेटप्रेमींना व्ही.व्ही.एस लक्ष्मणची 2001 मधील ऑस्ट्रेलियाविरुद्धची कोलकाता कसोटी सामन्यात खेळलेली 281 धावांची खेळीदेखील पाहता येणार आहे. हा कसोटी सामना 13 एप्रिल रोजी दर्शविला जाईल. 2005 मध्ये भारत आणि श्रीलंका खेळवण्यात आलेला एकदिवसीय सामना दरम्यान 14 एप्रिल रोजी दाखवला जाईल.
या 8 दिवसात एकूण 20 सामने डीडी स्पोर्ट्सवर दाखवले जातील. हे सर्व सामने भारतात खेळले गेले होते. यात 19 एकदिवसीय आणि कोलकाता येथे खेळलेला एकमेव अविस्मरणीय कसोटी सामना समाविष्ट आहे.